Mission- Vision

07 Dec 2019 15:07:46

श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहरात दिमाखाने उभी असलेली तसेच डॉ. बा. शि. मुंजे यांच्या अथक प्रयत्नाने साकारलेली सेन्ट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचालित भोंसला मिलिटरी स्कूल अविरतपणे, सातत्यपूर्ण ध्येयाने तेजोमय होत आहे. सन १९३२ वर्षापासून सुरु झालेली ही संस्था हळूहळू आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालेली आहे.

ह्याच भोंसला शृंखलेतील “शिशु वाटिका मराठी माध्यम” सन १९८६ साली सुरु झाली. भारतीय संस्कार व संस्कृतीच्या आधारे संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे या ध्येयाने व अनुभव, संस्कारक्षम उपक्रम याद्वारे बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी “घर हेच विद्यालय” ह्या संकल्पनेतून शालेय वातावरण तयार करणे या उद्देशाने परिपूर्ण असणारी शिशु वाटिका जिथे बालकाला मुक्तपणे निर्बंध वातावरणात फुलू दिले जाते. शिशु वाटिकेतील वातावरण हे पालकांच्या विचारापेक्षा विद्यार्थ्यांच्या भावनांना समजून घेईल असे असते. बालकाच्या विकासाच्या दृष्टीने शिशु शिक्षणाचे स्वरूप रचण्यात आलेले आहे.
Powered By Sangraha 9.0