Mission- Vision

शिशु विकासासाठी आवश्यक असणा-या सर्व घटकांचा विचार करून शिक्षक प्रबोधन, पालक प्रबोधन, करून शिशु विकास कसा साधावा ह्याचे सातत्याने मान्यवरांच्या विचारातून व चर्चेतुन मंथन केले जाते.

शिशु तसेच पालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

तसेच शिशु शिक्षणापेक्षा शिशु विकासाचे योग्य वय लक्षात घेऊन विद्यारंभ संस्कारांचे आयोजन केले जाते. शिशु विकासाचे मुख्य ध्येय लक्षात घेऊन शिशु मध्ये शिशु वयातच राष्ट्र भक्ती, संस्कार,¸ परंपरा यांचे बीज पेरण्याचे व उत्तम नागरिक घडवण्याचे प्रयत्न केले जातात.